शहर पोलीस दलातील 13 निरीक्षकांची नेमणूक

0
216

पिंपरी चिंचवड शहरात नव्याने बदलून आलेल्या 13 पोलीस निरीक्षकांची विविध पोलीस ठाण्यात तसेच गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली. याबाबत पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) माधुरी केदार-कांगणे यांनी गुरुवारी (दि. 7) आदेश दिले आहेत.

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांची विविध घटकांमध्ये बदली करण्यात आली. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 13 पोलीस निरीक्षक बदली होऊन आले आहेत. त्यांची नियंत्रण कक्ष येथून विविध पोलीस ठाण्यांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत या पोलिस निरीक्षकांना कर्तव्यार्थ तैनात करण्यात आले असल्याचे आदेशात म्हटले आहे.

नेमणूक केलेले पोलीस निरीक्षक (नेमणुकीचे ठिकाण)

अशोक कडलग (पिंपरी पोलीस स्टेशन)
शत्रुघ्न माळी (निगडी पोलीस स्टेशन)
निवृत्ती कोल्हटकर (वाकड पोलीस स्टेशन)
कन्हैया थोरात (हिंजवडी पोलीस स्टेशन)
प्रदीप रायन्नावार (तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन)
अंकुश बांगर (तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन)
जितेंद्र कोळी (चिंचवड पोलीस स्टेशन)
प्रमोद वाघ (चाकण पोलीस स्टेशन)
नितीन गीते (महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन)
विजय वाघमारे (देहूरोड पोलीस स्टेशन)
सुहास आव्हाड (गुन्हे शाखा)
गोरख कुंभार (गुन्हे शाखा)
संदीप सावंत (गुन्हे शाखा)