शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करावा यासाठी पवना माईला प्रार्थना – ॲड. सचिन भोसले

0
300

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जलपूजन

पिंपरी, दि. २३(पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांशी भागाला पाणीपुरवठा पवना धरणातून करण्यात येतो. हे पवना धरण दोन दिवसापूर्वी शंभर टक्के भरले आहे. बुधवारी (दि.२३) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या हस्ते पवना धरण येथे पुष्पहार अर्पण करून जलपूजन करण्यात आले. तसेच महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पवना माईला साडी, चोळी व श्रीफळ अर्पण करून शहरातील नागरिकांना अखंडपणे पाणीपुरवठा व्हावा अशी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी ॲड. सचिन भोसले म्हणाले की, मागील साडेचार वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरवर्षी पवना धरण शंभर टक्के भरत असताना देखील शहरातील नागरिकांना प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे व सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आणि आयुक्तांच्या आडमुठ्या धोरणामुळे पाणी समस्या उद्भवत आहे. आता तरी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी हेखेखोरपणा सोडून दररोज संपूर्ण शहराला २४ तास पूर्ण दाबाने आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी सद्बुद्धी पवना माईने द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी रोमी संधू, हाजी दस्तगीर मनियार आणि निलेश मुटके उपजिल्हा प्रमुख, अनिताताई तुतारे महिला शहर संघटीका, तुषार नवले पिंपरी विधानसभा प्रमुख, अनंत कोऱ्हाळे चिंचवड विधानसभा प्रमुख, वैशाली कुलथे पिंपरी महिला संघटीका, कल्पना शेटे भोसरी महिला संघटीका, संतोष वाळके शहर संघटक, संतोष सौदंनकर शहर संघटक, विजय गुप्ता पिंपरी शहर संघटक, दिलीप भोंडवे शहर संघटक, पांडुरंग पाटील उप शहर प्रमुख, हरेश नखाते उप शहर प्रमुख, नेताजी काशीद उप शहर प्रमुख, श्रीमंत गिरी उप शहर प्रमुख, अनिल सोमवंशी उप शहर प्रमुख, सुधाकर नलावडे उप शहर प्रमुख, युवराज कोकाटे उप शहर प्रमुख, शैलेश मोरे उप शहर प्रमुख, दादा नरळे शहर संघटक, रजनी वाघ उप शहर प्रमुख, विभाग प्रमुख संदीप भालके, नितीन बोंडे, दत्ताराम साळवी, गोरख नवघणे, चंद्रकांत शिंदे, सचिन चिंचवडे, गोरख पाटील, विठ्ठल कळसे, बेबी सय्यद, मंजुषा जोशी, पूनम रिटे, नीता शिंदे, मंदा फड, कमल गोडांबे, गीताताई कुसाळकर, उप विभाग प्रमुख पुरुषोत्तम वाईकर, दत्ता केदारी, दादाराव ठाकरे, नरसिंग माने, शाखा प्रमुख विजय चव्हाण, शिवसैनिक गजानन धावडे, विजय दर्शिले, प्रवीण राजपूत, राजेंद्र सिंग राठोड व बहुसंख्य शिवसैनिक आदी उपस्थित होते.