पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिका शिक्षण विभागाकडून शहरात मिशन “झिरो ड्रॉपआऊट” अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात 155 मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. यामध्ये 6 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला. या मुलांना प्राथमिक शाळेत दाखल करून घेतले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील एसटी स्टॅण्ड, वस्त्या, रेल्वे स्थानक, इमारत बांधकाम प्रकल्प, विविध चौक, बसथांबे आदी ठिकाणी शाळाबाह्य मुलांचा शोध सर्वेक्षणामध्ये घेतला आहे. शहरातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी समिती स्थापन करायची केली होती. या समितीमार्फत शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे केले. सर्वेक्षणात विद्यार्थ्यांचे नाव, पालकांचे नाव, वयोगट, कोणत्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले आहे अथवा शिक्षणच झालेले नाही, या बाबींची पडताळणी केली. हे सर्वेक्षण 24 हजार कुटूंबाचे करण्यात आले.
भोसरी, मोशी, पुनावळे, रावेत, काळा खडक या भागात केलेल्या सर्वेक्षणात 74 मुले, 81 मुली असे 155 मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. या मुलांचे, त्यांच्या पालकांचे प्रबोधन करुन मुलांना शाळेत दाखल करुन घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. महापालिका शिक्षण विभागाच्या विषयतज्ज्ञांनी यांचे नियोजन केले होते. यापूर्वी डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात 6 ते 10 वयोगटातील एकूण 1 हजार 23 मुले आढळली. तर 11 ते 14 वयोगटातील 84 मुले आढळली होती