शहरात भव्य दुचाकी रॅलीकडून मतदान जनजागृती

0
116

“मतदार राजा जागा हो,
लोकशाहीचा धागा हो”,

“भारत माता की जय”,

“वोट करेंगे वोट करेंगे,
तेरा मई को वोट करेंगे”

अशा घोषणा देत, हातात फ्लेक्स द्वारे शहरात भव्य दुचाकी रॅलीकडून मतदान जनजागृती करण्यात आली.

प्रबोधन मंच संस्था आणि पिंपरी व चिंचवड विधानसभा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येणा-या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये २२७ दुचाकी व चार चाकी स्वार सहभागी झाले होते.

रॅलीचा प्रारंभ पिंपरी येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून झाला, कार्यक्रमाच्या सुरूवतीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी पिंपरी चौक येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.

“आम्ही लोकशाहीवर निष्ठा ठेवून, निवडणुकांचे पावित्र्य राखून निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू” अशी शपथ उपस्थितांनी घेतली आणि मतदान टक्केवारी वाढण्यासाठी आम्ही सामाजिक बांधिलकीतून जास्तीत जास्त प्रयत्न करू असा निर्धारही व्यक्त केला.

यावेळी प्रबोधन मंच संस्थेचे दिपक शेंडकर, यांनी प्रबोेधन केले, हेमंत फुलपगार,श्रीरंग वाघ, अविनाश आगज्ञान यांच्यासह मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी आणि अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी मुकेश कोळप,विजय भोजने,राजाराम सरगर यांचे नियंत्रणात राजेंद्र कांगुडे, प्रिंस सिंह, दिपक येन्नावर,सचिन लोखंडे,ज्योती पाटील,संजय भाट, विजय वाघमारे यांनी जनजागृती केली.

प्रबोधन मंच हि स्वयंसेवी संस्था प्राधान्याने मतदान जागृती करिता सातत्याने काम करत आहे.