शहरात काँग्रेसला मतदार संघ मिळण्याचे राज्य नेतृत्वाकडून संकेत

0
82

पिंपरी, दि.५ – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज पुणे काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित पश्चिम महाराष्ट्र विधानसभा आढावा बैठकीचे नियोजन केले होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी श्री रमेश चेन्नीथला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नाना पटोले, माजी मुख्यमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे श्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते श्री विजय वडट्टीवार माजी मंत्री श्री माणिकराव ठाकरे नसीम खान खासदार प्रणिती शिंदे आमदार सतेज पाटील रवींद्र धंगेकर ,जयश्री पाटील ,संग्राम थोपटे यांच्यासह राज्यातील सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीच्या वेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलास कदम यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघातील विधानसभा निहाय अहवाल राज्यस्तरीय नेत्यांना सादर केला आणि शहर काँग्रेसकडून विविध आंदोलने व करदात्यांसोबत संवाद यात्रा याविषयीची माहिती देत तिन्ही मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावे अशी मागणी केली सर्व मतदारसंघातील बूथ स्तरावरील माहिती दिली यावेळी राज्य नेतृत्वाकडून विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निश्चित न्याय देण्यात येईल असे आश्वासन राज्य कमिटीच्या नेत्यांकडून देण्यात आले.

याप्रसंगी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, सौ. श्यामला सोनवणे, निगार बारस्कर, भाऊसाहेब मुगुटमल, तुकाराम भोंडवे, बाबू नायर, अभिमन्यु दहितुले, अमर नाणेकर, संदेश नवले, वाहब शेख, चंद्रकांत लोंढे, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सायली नढे, कौस्तुब नवले, प्रा. किरण खाजेकर, डॉ. मनिषा गरुड, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, जार्ज मॅथ्यू, शहाबुद्दीन शेख, विशाल सरवदे, रवि नांगरे, बाबासाहेब बनसोडे, स्मिता पवार-मुलाणी, निर्मला खैरे, अरुणा वानखेडे, वसंत वावरे, पंकज बगाडे, रवींद्र कांबळे, गौरव चौधरी, चंद्रशेखर जाधव, कुंदन कसबे, राजन नायर, सौरभ शिंदे, स्वाती शिंदे, अॅड. उमेश खंदारे, सुरज गायकवाड, बाबा आलम शेख, सुरज कोथिंबीरे, तारीक रिजवी, माजिद अली, हरिष डोळस आदींसह या बैठकीस शहर काँग्रेस मधील इतर पदाधिकारी उपस्थित होते.