पिंपरी, दि. 20- पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा आत्महत्येच्या घटनांनी हादरले आहे. गेल्या २४ तासांमध्ये चार जणांनी आत्महत्या केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे.आत्महत्येच्या पहिल्या घटनेत गोविंद गौतम (वय १९, रा. सुसगाव, ता. मुळशी जि. पुणे) याने आत्महत्या केली आहे.
गोविंद याने लेबर कॅम्प शेजारी असलेल्या शेतातील आंब्याच्या झाडाला लाल रंगाच्या नॉयलॉन दोरीने गळफास घेतल्याने बुधवारी सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास उघडकीस आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
आत्महत्येच्या दुस-या घटनेत साखरबाई काशिनाथ साठे (वय ५९, रा. आम्रपाली हौसिंग सोसयटी, ओटास्कीम, निगडी) या महिलेने दोरीने घरातील फॅनच्या हुकाला बुधवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. साखरबाई यांना गेल्या वर्षभरापासून रक्तदाब आणि मधूमेहाचा आजार होता. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.आत्महत्येच्या तिस-या घटनेत रिमू बालकराम सिंग (वय २४, रा. दिघी) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. रिमू यांनी गुरूवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास पंख्याला साडीच्या मदतीने गळफास घेतला. आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.आत्महत्येची चौथी घटना काळाखडक, वाकड येथे घडली. मोहम्मद अफजल (वय १९, रा. काळाखडक सिग्नलजवळ, वाकड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मोहम्मद अफजल याने बुधवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास सुरक्षा बेल्टने गळफास घेतला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी प्रियकरावर गुन्हाएका २५ वर्षीय तरुणीला ॠषी अरुण जाधव (रा. वडगाव शेरी, पुणे) या तरुणाने लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर लग्नासाठी दुसरी मुलगी पाहायला जात असल्याचे सांगून दबाव आणला. यामुळे आलेल्या नैराश्यातून तिने काटेपूरम चौकाजवळील राहत्या घरी ४ सप्टेंबर रोजी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत तिच्या वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.















































