शहरात एकाच दिवशी सहा चोरीच्या घटना

0
376

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोरीच्या सहा घटना उघडकीस आल्या आहेत. त्याबाबत मंगळवारी (दि. १४) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सहा घटनांमध्ये सहा लाख ९७ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

विक्रम विलास भालेराव (वय २६, रा. सुसगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भालेराव यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून ३८ हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. सुरज सुखमलिंदर सिंग कंन्डा (वय २५, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या घराचा सेफ्टी दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने मोबाईल, दागिने आणि पैसे असा २८ हजारांचा ऐवज चोरून नेला.
शिशिर भास्कर भालेराव (वय ४०, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भालेराव यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी ७९ हजारांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. हिरामण चंदर कांबळे (वय ५३, रा. खोपोली, जि. रायगड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी कांबळे लोणावळा ते निगडी पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना त्यांच्या बॅगमधून त्यांच्या पत्नीची पर्स चोरीला गेली. त्यात दागिने आणि कागदपत्र असा एक लाख ८४ हजार ५० रुपयांचा ऐवज होता.

मंगला देविदास पवार (वय ६०, रा मालपूर, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी आणि त्यांचे पती धुळे ते पुणे असा शिवशाही बसने प्रवास होते. बस प्रवासादरम्यान त्यांच्या बॅग मधून दोन लाख ८८ हजारांचे दागिने अज्ञाताने चोरून नेले. शिवम कैलास हजारे (वय २४, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फ्र्यादी यांच्या मामाच्या नावावर असलेली ८० हजारांची बुलेट अज्ञात चोरट्यांनी एच ए ग्राउंडच्या समोरील फूटपाथ वरून चोरून नेली.