शहरातील १३ पोलीस निरीक्षकांच्‍या अंतर्गत बदल्या

0
15

दि . ११ ( पीसीबी ) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात १३ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. शहरातील विविध ठाणे, वाहतूक शाखा आणि गुन्हे शाखांमधील जबाबदाऱ्या अदलाबदल करून नव्या नियुक्‍त्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक निलेश दत्ता वाघमारे यांची बदली दापोडी पोलीस ठाण्यातून वाहतूक शाखेत, रणजित विष्णू जाधव यांची तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातून वाहतूक शाखेत, संजय ज्ञानोबा चव्‍हाण यांची विशेष शाखेतून निगडी पोलीस ठाण्‍यात, तर महेंद्र पंढरी कदम यांची बदली वाहतूक शाखेतून नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
याशिवाय, संतोष बळीराम पाटोल यांची बदली गुन्हे शाखेतून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात, विनोद विष्णू पाटील यांची बदली गुन्हे शाखेतून चाकण पोलीस ठाण्‍यात, निता नितीन गायकवाड यांची बदली वाकड पोलीस ठाण्‍यातून वाहतूक शाखेत करण्‍यात आलीआहे. तसेच महेश हंबीरराव पाटील यांची बदली नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखेत, नाथा ज्ञानू घार्गे यांची बदली चाकण पोलीस ठाण्‍यातून भोसरी पोलीस ठाण्‍यात, रामचंद्र नारायण घाडगे यांची बदली नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत, भोजराज विष्णू मिसाळ यांची बदली निगडी पोलीस ठाण्‍यातून भोसरी एमआयडीसी ठाण्‍यात, प्रदीप बाजीराव पाटील यांची बदली वाहतूक शाखेतून दापोडी पोलीस ठाण्‍यात तर पोलीस निरीक्षक भारत साहेबराव शिंदे यांची बदली भोसरी पोलीस ठाण्‍यातून नियंत्रण कक्षात करण्‍यात आली आहे.