शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे बुजवा, कासारवाडी जलतरण तलावावरील अधिकारी कर्मचारी यांचेवर करा

0
320

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पावसाळा संपुण महिना उलटत आला आहे तरीदेखील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत याबद्दल प्रशासनाचा मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला व रस्त्यावरील या खड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. यामुळे शहरातील नागरिकांचे नाहक बळी देखील गेलेले आहेत, हे सर्व सुरु असताना प्रशासनाना डोळेझाकपणा कशासाठी ? याच शहरातील नागरिकांनी मोठा कररुपी टैक्स देवून इतिहासामध्ये नाव कोरलेले आहे. परंतु त्यांच्या पदरात निराशा आपण देत आहात याचा आम्ही मनसेच्या वतीने निषेध व्यक्त केलेला आहे. लवकरात लवकर हे शहर खड्डेमुक्त करावे ही नम्र विनंती केलेली आहे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.

त्याचप्रमाणे कासारवाडी जलतरण तलावातील घडलेली घटना दुर्दैवी असून त्यातील दोषी अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करून त्यांचेवर कडक कारवाई करण्यास सांगितले आहे.

त्या प्रसंगी शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला अध्यक्ष सीमाताई बेलापुरकर, शहर सचिव रुपेश पटेकर, उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, चंद्रकांत(बाळा) दानवले, राजू सावळे, विभागअध्यक्ष दत्ता देवतरासे, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, वैशाली बोत्रे,विद्या कुलकर्णी, योगिता कांबळे, श्रद्धा देशमुख, नितीन चव्हाण, नितीन सूर्यवंशी, पांडुरंग जगताप, कैलास दुर्गे, के के कांबळे, आकाश सागरे, तानाजी शेवते, एलेक्स आप्पा मोझेस, काशिनाथ खजुरकर, गोरख मदने, नारायण पठारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.