पिंपरी , दि .२१ (पीसीबी) – शनिवार दि.२०/०१/२०२४ रोजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांना लेखी निवेदन दिले आहे.
आपल्या या लेखी निवेदनात नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या VMD स्क्रीन वर प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे .
आपल्या पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत जागोजागी VMD स्क्रीन उभे करण्यात आले आहे.
देशातील जनतेचे गेली अनेक वर्षे केवळ स्वप्नच ठरलेले आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न येत्या २२ जानेवारीला सत्यात उतरत आहे.या मंदिराचा लोकार्पण सोहळा एक ऐतिहासिक सोहळा व्हावा अशी इच्छा देशाच्या प्रत्येक भारतीयांची आहे. प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सर्व रामभक्तांना भावनिक आवाहन केले आहे की २२ जानेवारी रोजी सर्वांनी अयोध्येत येणे टाळावे कारण की जनसमुदाय सागर अयोध्येत आल्यास सुख सोयी सुविधांचा तुटवडा उद्भवू शकतो परिणाम रामभक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ शकते.
देशाचे पंतप्रधान यांनी केलेल्या आवाहनाला एक सकारात्मक प्रतिसाद देत जर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी उभे करण्यात आलेल्या VMD स्क्रीन वर रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केल्यास पिंपरी चिंचवड परिसरातील रामभक्तांना या ऐतिहासिक क्षणाचा भाग बनता येईल तसेच आपल्या या पुढाकाराने नागरिकांना या भव्यदिव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यास मदत होईल.
म्हणून शहरातील वि
विध ठिकाणी असलेल्या VMD स्क्रीन वर प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा थेट प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे .