शहरातील रस्त्यांवर खड्डेच-खड्डे, प्रशासन म्हणतेय खड्ड्यांची आकडेवारी नाही!

0
406

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील रस्त्यांवर खड्डेच-खड्डे झाले आहेत. रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लाग आहेत. पहिल्याच पावसात महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. दरम्यान, किती खड्डे आहेत, याची आकडेवारी उपलब्ध नाही. टप्प्या-टप्प्याने खड्डे बुजविण्याचे काम सुरु असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येते.

पिंपरी-चिंचवड शहर म्हटले की अनेकांना प्रशस्त रस्त्यांचे चित्र दिसते; मात्र हे चित्र किती पोकळ आहे. ते पहिल्याच झालेल्या जोराच्या पावसामुळे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व भागातील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. कासारवाडी, वल्लभनगर येथील एसटी स्टॅन्ड, निगडी भक्ती-शक्ती चौक, चिंचवडमधील बिर्ला हॉस्पिटल, दापोडी, पिंपळेगुरव आणि मोशीसह शहराच्या अनेक भागातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी घसरूनही पडत आहेत. दरम्यान, शहरात किती खड्डे आहेत. याची नेमकी आकडेवारी नाही. खड्डे टप्प्या-टप्प्याने बुजविण्यात येत असल्याचे स्थापत्य विभागाकडून सांगण्यात आले.