शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे…. ला. शैलजा सांगळे

0
64

सांगवी : मोठ मोठ्या शहरातील प्रदूषण कमी करायचे असेल तर प्रत्येक भागात झाडे लावणे गरजेचे आहे. अनेक धर्मादायी संस्था वृक्षारोपण करतात पण नंतर झाडांचे संवर्धन केले जात नाही. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे .लायन्स क्लब पुणे रहाटणीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या पीडब्ल्यूडी मैदान सांगवी या ठिकाणी आज 200 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले व त्याचे संवर्धन ही करण्यात येणार आहे खूप चांगले काम आहे, असे मत रिजन चेअर पर्सेंट झोन थ्री च्या ला.शैलजा सांगळे मॅडम यांनी व्यक्त केले लायन्स क्लब पुणे रहाटणी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते त्यांचे अध्यक्ष ला. शिवाजी माने व टीम यांचे हे काम कौतुकास्पद आहे असे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी वृक्षमित्र ज्यांनी महाराष्ट्रभर पन्नास हजारापेक्षा जास्त झाडांचे स्वखर्चाने वृक्षारोपण केले आहे असे वृक्षमित्र महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त करते सामाजिक कार्यकर्ते मा. अरुण पवार यांनी 200 झाडे लागवडीसाठी दिली व मा. नगरसेवक संतोषजी कांबळे यांनी ही झाडे लावण्यासाठी खड्डे खाणून देण्यासाठी मदत केली. तसेच झाडे ,बांबू ,जाळ्या टेम्पो ने आणण्यासाठी आमचे मित्र ला. प्रसाद वाडकर यांनी मोलाची मदत केली. यावेळी कै.शकुंतलाबाई आनंदराव शितोळे शाळा व बारा घोलप विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी व सांगवी क्रिकेट असोसिएशनच्या सर्व खेळाडूंनी झाडे लावण्यासाठी मोलाची मदत केली.

याप्रसंगी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन पर्यावरण ला.किशोर मोहोळकर ,डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन वृक्षारोपण ला. विराट मैसूरी ,झोन चेअरपर्सन एमजेएफ ला. वसंत भाऊ कोकणे , एमजेएफ ला.वैशाली कोकणे ला.सविता माने,ला. अशोक बनसोडे, ला. सतीश महाजन, ला.सतिश सावंत,सातारा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष संजय चव्हाण, क्लब खजिनदार ला. विलास कातोरे, राधाकिशन आवारी सर, जवाहर ढोरे, हिरण सोनवणे, काळू ढोरे, अरुण मोरे अशोक मारणे ,अजय दुधभाते, मेहबूब शेख, धम्मा दादा,सर्व क्रिकेट खेळाडू तसेच पिंपळवण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली व झाडे लावण्यासाठी मदत केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लब अध्यक्ष ला.शिवाजी माने व निवेदन आभार क्लब सचिव महेश पांचाळ यांनी केले.