शहरातील गर्भवती महिलांचे ‘सिझेरियन’चे प्रमाण चिंताजनक!

0
302

पिंपरी दि. १८ (पीसीबी) – मुल जन्माला घालणे हे प्रत्येक महिलेसाठी जितके आनंददायी आहे तितकेच कठीण देखील आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील गेल्या चार वर्षांतील गर्भवती महिलांची सिझेरियनची आकडेवारी पाहिल्यानंतर सिझेरियनचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.

महिलांच्या डिलिव्हरी दोन प्रकारांनी होते. एक म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी आणि दुसरी म्हणजे सिझेरियन डिलिव्हरी. नॉर्मल डिलिव्हरी व्हावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जास्त धोका नसतो आणि काही दिवसांत स्त्रीचे शरीर पुन्हा पूर्ववत होते आणि ती आपले दैनंदिन आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकते. सिझेरियन डिलिव्हरीचा पर्याय तेव्हा वापरला जातो जेव्हा आई, बाळाच्या जीवाला किंवा आरोग्याला धोका निर्माण होणे, बाळाच्या ह्दयाची ठोके कमी होणे, रक्तदाब वाढणे, नाळ गळ्याभोवती असणे किंवा गर्भ पिशवीतील पाणी कमी होणे, अशा विविध कारणांनी सिझेरियन डिलिव्हरी केली जाते.