शहरातील किवळे भागात लेबर कॅम्प / झोपडपट्टी मुळे नागरिक त्रस्त

0
8
  • झोपडपट्टी त्वरित हटविण्याची मागणी
  • अर्धवट रस्ते / वीज खांब नसल्याने चोरीचे प्रमाण वाढले
  • प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
  • आयुक्तांसह लोकप्रतिनिधींना निवेदन
  • रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात

दि . 12 ( पीसीबी )शहरातील मुकाई चौक किवळे परिसरातील साई ओरा सोसायटी बाजूला असलेल्या लेबर कॅम्प तसेच या भागातील झोपडपट्टी ला जमीन मालकांनी भाडे तत्वावर दिल्याने या भागातील रहिवाशांना मोठा त्रास सुरू झाला आहे त्यात नव्याने या भागात झोपडपट्टी तयार होत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक रहिवासी सुरक्षेच्या कारणावरून भीतीच्या वातावरणात आहेत. आधीच या भागातील अर्धवट रस्ते, वीज खांब नसल्याने, स्थाजिक जमीन मालक अनधिकृत दुकानांना जागा देत असल्याने, झोपडपट्टी वाढ होत असल्याने अधिकृत करदाते त्रस्त झाले आहेत. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चोऱ्यांचे प्रमाण, अस्वच्छता वाढली आहे. अनधिकृत आर एम सी प्लांट रस्ते डांबरीकरण अर्धवट सोडल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे, धुळीचे साम्राज्य आहे. महानगरपालिका प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून स्थानिक रहिवासी, सोसायटीधारक मोठ्या जनआंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. या भागातील झोपडपट्टी त्वरित हटविण्याची आग्रही मागणी या भागातील ईडन स्पेस, साई औरा, वरदंत पार्क, व्हिजन अरोस्तो, लोटस लक्ष्मी, इंद्रा पार्क, उदय पार्क, मंगल विश्व, विठ्ठल हाईट्स सोसायटी, के टाऊन सह आदर्श नगर परिसरातील हजारो रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे. भविष्यात हे टाळण्यासाठी परिसरात रहिवासी सोसायटी शेजारील जमिनी कुठल्याही कारणास्तव भाडे तत्वावर देताना नेमके कशासाठी देत आहेत याची एनओसी शेजारील सोसायटी कडून घेण्याची मागणीही यावेळी करण्यात येत आहे.

  • झोपडपट्टी मुळे सुरक्षेचा, पाण्याचा, स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
  • त्वरित कारवाई करून हटविण्याची मागणी
  • या भागात पोलीस पेट्रोलिंग ची मागणी