शहरातील करदाते नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कॉंग्रेसचे जनसंवाद आंदोलन

0
146

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रत्येक प्रभागात (३२ प्रभाग) “कॉग्रेस पक्ष करदाते नागरीकांच्या दारी” जनसंवाद अभियान सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन काल (दि.२) रोजी नरवीर तानाजी मालुसरे पुतळ्यासमोर, दापोडी येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेसच्या सह प्रभारी सोनल पटेल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शहरातील पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, वैद्यकीय सुविधा, बेरोजगारी, शिक्षण, स्वच्छता, वाहतूक वगैरेंसारखे विविध प्रश्न जटील स्वरूप धारण करीत आहेत. कॉग्रेस पक्षाच्या वतीने शहरात वरिल सर्व विषयांबाबत आवाज उठविण्यासाठी हे जन आंदोलन उभे करीत आहोत. कारण महानगरपालिकेची निर्मिती, एम.आय.डी.सी., धरणे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, वाय.सी.एम. हॉस्पिटल प्रकल्प, हिंजवडी आयटी पार्क यांसारखे सर्वंच प्रकल्प, योजना कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहरात आलेल्या आहेत अन् आज शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली सर्वत्र चुकीच्या घटना होत आहे. अशा वेळी कॉग्रेस पक्ष शांत बसणार नाही, नागरिकांचा आवाज होऊन जनआंदोलन उभारणार आहे.

यावेळी यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी तानाजी काटे, भाऊसाहेब मुगुटमल, प्रदेश पर्यावरण विभागाचे सरचिटणीस अमर नाणेकर, सेवादल अध्यक्ष ॲड.किरण खाजेकर, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, पर्यावरण विभाग अध्यक्ष अक्षय शहरकर, झोपटपट्टी सेल अध्यक्ष बी.बी.शिंदे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष ॲड. अशोक धायगुडे, उपाध्यक्ष सोमनाथ शेळके, बाबासाहेब बनसोडे, महेश पाटील, वाहब शेख, अण्णा कसबे, गौतम ओव्हाळ, राधिका अडागळे, सीमा यादव, मिलिंद फडतरे, दिपक श्रीवास्तव, बाबा आलम शेख, हरिश डोळस, सागर ओरसे, ॲड.अनिकेत रसाळ, देवानंद ढगे, रवि कांबळे, मेहबूब शेख, सचिन गायकवाड, राजा वाळूंजकर, राजेंद्र काटे, धनाजी गावडे, वसंत वावरे, भीमराव जाधव, भाऊसाहेब पठारे, अनिल आंग्रे, सोमनाथ गायकवाड, जयंती गायकवाड, सारिका कांबळे, प्रेमा गायकवाड, उजवला मडगूबे, सारिका गायकवाड, शांताबाई यादव आदि उपस्थित होते.

उद्घाटनावेळी सोनल पटेल म्हणाल्या की, कॉग्रेस पक्ष सर्व जाती धर्माच्या नागरीकांना सोबत घेवून देश उन्नतीचे काम करत आहे, देशाची प्रगती फक्त कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून होऊ शकते, देशाला स्वयंभू कॉग्रेसने केले आहे, या शहरात नागरिकांचे मुलभुत विषयांवर निर्माण झालेले प्रश्न कॉग्रेस पक्ष सोडवु शकतो. हे आंदोलन शहरातील प्रत्येक नागरिकांचे आहे यात आपण सर्वांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला पाहिजे.