शहराच्या सर्व भागात समान पाणीपुरवठा करा – समीर जावळकर

0
275

पि्ंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार सुरु आहे. पायलट प्रकल्पाच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. काही भागात चोवीस तास तर काही भागात दोन दिवसांनी पाणीपुरवठा होता. पाणीपुरवठा विभागाने सर्व भागात समान पाणीपुरवठा करावा, अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष समीर जावळकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांना निवेदन दिले आहे. त्यात जावळकर यांनी यांनी म्हटले आहे की,  पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला. पायलट प्रकल्पाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात आहे. पालिकेकडून निगडी गावठाण परिसरात गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. पण, काही  भागातील परिसरात कुठे 24 तास, कुठे रोज, कुठे सकाळी व संध्याकाळी आशा पद्धतीने मनाला वाटेल असा पाणीपुरवठा केला जात आहे.

आम्हाला 24 तास नको. पण रोज पाणी द्यावे.  शहरातील काही झोपडपट्ट्यां मधे काही भागांत 24 तास पाणी पुरवठा होते.  मग तिथे पायलट प्रकल्प चालू आहे का, संपूर्ण शहराला समान पाणीपुरवठा करण्याची मागणी जावळकर यांनी निवेदनातून केली.