शहराचा दहावीचा निकाल 97.73 टक्के; गतवर्षीपेक्षा 2.19 टक्‍क्‍यांनी निकाल घटला

0
322

पिंपरी दि. १७ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड शहराचा दहावीचा निकाल 97.73  टक्के लागला आहे. मुलींचा निकाल 98.39 टक्के तर मुलांचा निकाल 97.17 टक्के  लागला आहे. 124 शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकच्यावतीने मार्च 2022 मध्ये घेतल्याला दहावी परीक्षेचा निकाल आज (शुक्रवारी) ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. शहरात दहावीच्या परीक्षेला 188 शाळांमधून एकूण 19, 674  विद्यार्थी बसले होते. यामध्ये 10, 616 मुले व 8978 मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यातून 10, 316 मुले तर 8834 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण 19 हजार 150 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागीलवर्षी शहराचा निकाल 99.92  टक्के लागला होता. त्या तुलनेत यंदा निकालात 2.19 टक्‍क्‍यांनी घट झाली.

 शहरातील 423 पुर्नपरीक्षार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 300 मुले तर 123 मुली होत्या. यातर 422 पुर्नपरीक्षार्थ्यांनी दिली. त्यापैकी 209 पुर्नपरीक्षार्थ्यांनी यश मिळविले आहे. यापैकी 152 मुले व 57 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची 50.83 टक्के तर 46.34 टक्‍के मुलींची टक्केवारी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 18 माध्यमिक शाळांचा 91.09 टक्के निकाल लागला आहे. पिंपरी आणि क्रीडाप्रबोधिनी शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तर, सर्वाधिक कमी रूपीनगर शाळेचा 71.30 टक्के निकाल लागला आहे.