– खासदार श्रीरंग बारणे यांच्यातर्फे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठांना ध्वजाचे वाटप
पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून ध्वजाचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरावर ध्वज फडकाविण्यासाठी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्त्यांना ध्वजाचे वाटप केले. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.
थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे, जेष्ठ नागरिक संघाचे विलास जगदाळे, नंदू सुतार, विजय पाटील, नंदू जाधव, बाळासाहेब वाघमोडे, हनुमंत माळी, सुरेश राक्षे, माउली घोगरे, गणेश खानेकर, राजू शेख, शशी कात्रे, निलेश पिंगळे, सुरज बारणे, विक्रम झेंडे, अक्षय परदेशी, मंदार येळवंडे, ओंकार पुजारी, योगेश साठे, प्रमोद चव्हाण, उमेश रजपूत आदी कार्यकर्ते शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, ”भारत यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्याचे निमित्ताने सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम, मोहिमा राबविल्या जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानाची घोषणा केली आहे. हर घर तिरंगा अभियानाचा मुळ उद्देश देशातील नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृक करणे हा आहे”.
”स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने हे अभियान राबवले जात आहे. याचा उद्देश लोकांच्या मनात देशभक्ती जागृक करणे आणि राष्ट्रध्वजाबाबत जागृकता वाढवणे आहे. या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे”, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.