शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

0
391

तळेगाव, दि. १९ (पीसीबी)

शस्त्र बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 16) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास खळदेनगर, तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

अक्षय प्रभाकर साबळे (वय 30, रा. खळदे नगर, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संकेत घारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय साबळे याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 50 हजार रुपये किमतीची एक रिव्हॉल्वर, 1500 किमतीची तीन जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख एक हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.