शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
326

कोयता हे शस्त्र बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन कोयते जप्त केले आहेत. ही कारवाई सोमवारी (दि. 27) सायंकाळी सहा वाजता सखुबाई उद्यानाच्या मागे, भोसरी येथे करण्यात आली.

रोशन गोपाल ओड (वय 19, रा. गवळी नगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार स्वामी नरवडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील सखुबाई उद्यानाच्या मागील बाजूला मोकळ्या मैदानात एक तरुण कोयते घेऊन आला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन रोशन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.