शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
538

शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 17) सायंकाळी सोनावणे वस्ती रोड, चिखली येथे करण्यात आली.

आकाश बाबू नडविनमनी (वय 22, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनावणे वस्ती रोड, चिखली येथे एकजण शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन आकाश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपये किमतीचा एक कोयता आढळून आला. पोलिसांनी कोयता जप्त करत आरोपीला अटक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.