शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा; दोघांना अटक

0
1028

चिखली , दि. १ (पीसीबी) – शस्त्र बाळगल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 1) मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास पंतनगर चिखली येथे करण्यात आली.

उमेश अशोक कांबळे (वय 22), सुनील पांडुरंग गायकवाड (वय 19), राहुल गणेश राठोड (तिघे रा. जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. उमेश आणि सुनील या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक वरे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतनगर, चिखली येथे तिघेजण आले असून त्यांच्याकडे शस्त्र असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कारवाई केली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता आणि एक दुचाकी जप्त केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.