शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
299

खेड, दि. २८ (पीसीबी) – शस्त्र बाळगल्या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. २७) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.

वैभव काशिनाथ बाचणे (वय २४, रा. मेदनकरवाडी, ता. खेड. मूळ रा. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यानुसार पोलीस अंमलदार अमोल माटे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथे एकजण संशयितपणे थांबला असल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून वैभव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी ३०० रुपये किमतीचा चाकू जप्त केला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.