शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार आरोपीला अटक

0
479

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 5) सायंकाळी आळंदी रोड भोसरी येथे करण्यात आली.

अभिषेक दिगंबर घोरपडे (वय 21, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सचिन सातपुते यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक घोरपडे याला 28 डिसेंबर 2021 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. तसेच तो शस्त्र बाळगत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आळंदी रोड भोसरी येथील एका शाळेसमोरील मोकळ्या मैदानात सापळा लावून कारवाई केली. यामध्ये आरोपी अभिषेक घोरपडे याच्याकडून 200 रुपये किमतीचा कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.