शस्त्र बाळगल्या प्रकरणी चार गुन्हे दाखल

0
467

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – शस्त्र बाळगल्या प्रकरणी पिंपरी, चाकण, तळेगाव दाभाडे आणि सांगवी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे.

शस्त्र विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन युनिस अत्तार यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी सायंकाळी सव्वापाच वाजता नवमहाराष्ट्र शाळेजवळ पिंपरी येथे शस्त्र विरोधी पथकाने एका अल्पवयीन मुलाला कोयता बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले. त्याच्याकडून २०० रुपयांचा कोयता जप्त करून त्याला समजपत्र देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस शिपाई योगेश्वर कोळेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषिकेश जयवंत शिंदे (वय १९, रा. धानोरे, ता. खेड) याला अटक करून त्याच्याकडून दोन हजार रुपये किमतीची तलवार जप्त केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी फिर्याद दिली आहे. प्रशांत उर्फ परशुराम तानाजी ननावरे (वय ३०, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. सातारा) याला अटक केली आहे. आरोपीकडून कोयता जप्त केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

ज्ञानेश्वर बाबुराव मुरकुटे (वय ५८, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत राजेंद्र मुरकुटे (वय २१, रा. पिंपळे निलख) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने लोखंडी हत्यार उगारून फिर्यादींना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.