दि . १८ . पीसीबी – एका तरुणाला कोयता बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (१६ ऑगस्ट) रात्री श्रमिकनगर, ओटास्किम, निगडी येथे अशोक गायकवाड यांच्या घरासमोर घडली.
याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस कॉन्स्टेबल सोहेल चिखलकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अरमान बंदेनवाज पठाण (१९, ओटास्किम, निगडी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे ३०० रुपये किमतीचा एक धारदार लोखंडी कोयता जवळ बाळगला. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अरमान पठाण याला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.