शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार गुंडाला अटक

0
577

चिंचवड, दि. २७ जुलै (पीसीबी) – पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपार केलेली आरोपी बेकायदेशीरपणे शहरात आला. त्याने स्वतःजवळ शस्त्र बाळगले. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 26) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास आनंदनगर चिंचवड येथे करण्यात आली.

निकेश बाळू आल्हाट (वय 21, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रमोद हिरळकर यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निकेश अल्हाट याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपरीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कुठलीही परवानगी न घेता शहराच्या हद्दीत आला. त्याने स्वतःजवळ शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याकडून सत्तूर हे शस्त्र जप्त करण्यात आले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.