शशी एंटरप्रायझेसला २५ वर्षे पूर्ण …!

0
330

चिंचवड, दि. ०२ (पीसीबी) – मेडिकल क्षेत्रातील एक प्रमुख आणि नावाजलेले नाव अर्थात शशी एंटरप्रायझेस आज रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. चिंचवड मधील समाजवादी कार्यकर्ते आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख असणारे श्री कन्नन नांबियार हे शशी एंटरप्रायझेसचे संचालक आहेत. ज्यांनी पिंपरी-चिंचवडच्या वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नेतृत्व श्री कन्नन नांबियार हे करतील. या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात शशी एंटरप्रायझेसचा संपूर्ण प्रवास उलगडला जाणार आहे. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर आणि प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे.