शरीर साथ देईना, पाय सुजले, वात आला… ; जरांगेंच्या भाषणाने जनसमुदाय भावुक!

0
564

लोणावळा, दि. २५ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरपारची लढाई पुकारणारे मनोज जरांगे-पाटील यांचा विराट मोर्चा आता मुंबईकडे कूच करत आहे. काल रात्री लोणावळ्यातील मुक्कामानंतर आज सभा पार पडली. शेवटच्या मराठाबांधवाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही, असं आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिले आहे. यावेळी त्यांनी त्यांची प्रकृती साथ देत नसल्याचाही उल्लेख केला आहे. यामुळे एक भावनिकतेची लाट मराठा समाजात पसरल्याचे दिसून आले.
“आपल्याला मुंबईला जायचं आहे. आता फक्त वाशीचा एकच मुक्काम राहिला आहे. आता थेट मुंबई गाठायची आहे. आजपासून मोर्चाची गर्दी वाढणार आहे. एवढी गर्दी आयुष्यात कधी पाहिली नाही. शेवटच्या मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

‘आंदोलनात घातपात होणार नाही,’ याची दक्षता घ्या –
आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ करतंय का, याकडे लक्ष ठेवा. कुणी अनुचित प्रकार करीत असेल तर मग तो आपला असेल किंवा कुणाचाही असेल, त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. आपल्या मोर्चात माता-माऊली येणार आहेत. त्यामुळे सतर्कता बाळगा. कितीही थंडी वाजली तरी माघार घ्यायची नाही, आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे फिरायचं नाही, असा इशाराही जरांगेंनी दिला