शरयू मोटर्स कार्यालयावर छापा, पैसे वाटप असल्याची तक्रार

0
46

बारामती, दि. १९ (पीसीबी) –
विधानसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. अशातच . युगेंद्र पावरांच्या शरयू मोटर्स या ठिकाणी पैसे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. माहिती मिळाल्यानंतर लगेच, निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले होते. यावेळी त्यांना काहीही आढळून आले नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्याकडे पैसै वाटप होत असल्याबाबत तक्रार आली होती. त्यानुसार आम्ही शरयू माटार्स या ठिकाणी तपासणी केली होती. पण त्या ठिकाणी आम्हाला काहीही आढळून आले नसल्याचे नावडकर म्हणाले.

बारामती शहरापासून जवळस असलेलं शरयू मोटार्स आहे. या ठिकाणी पैसाचं वाटप चालु असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले असता त्यांना काहीच आढळून आलं नाही. याबाबत एबीपी माझाशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, रात्री साडेदहा वाजता 10 ते 12 अधिकारी आले होते. त्यांनी सगळे सर्च ऑपरेशन केलं. त्यांना इथं काहीही मिळालं नाही. त्यांना आण्ही सहकार्य केल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. याबाबत मला काहीही माहित नाही. तक्रार कोणी दिली हे आम्ही विचारले पण त्यांनी काहीच माहिती दिली नसल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. जोपर्यंत काही फॅक्ट्स समोर येत नाहीत, त्यामुळं त्याबाबत बोलणंयोग्य होणार नसल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. होणाऱ्या सगळ्या चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार असल्याचे युग्रेंद्र पवार म्हणाले.

सत्तेत आहेत, त्यामुळं हे सगळं होणारच : श्रीनिवास पवार
याबाबत युगेंद्र पवार यांचे वडील आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. रात्री शोरुम बंद होते. मात्र, अधिकारी आल्यावर त्यांनी तक्रार आल्याचे सांगितले. त्यानंतर आमच्या स्टाफने अधिकाऱ्यांना शोरुमध्ये नेल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शोरुमची सगळी झाडाझडती घेतली. पण त्यांना इथं काही मिळालं नाही. ते सत्तेत आहेत, त्यामुळं हे सगळं होणारच असेही श्रीनिवास पवार यावेळी म्हणाले.