शरद मोहळ हिंदुत्ववादी, माध्यांनी चुकीची प्रतिमा रंगवू नये – नितेश राणे

0
344

पुणे, दि. ९ (पीसीबी) : “शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आणि कसे आले, याची तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे मीडियाने उगीचच त्यांची प्रतिमा मलिन करू नये. मीडियामधील काहींनी त्यांची चुकीची प्रतिमा रंगवल्याने मोहोळ कुटुंबियांना त्रास झाला. हिंदुत्वासाठी आभाळभर काम केलेलं असताना मीडिया चुकीच्या पद्धतीने त्यांची माहिती देत असेल तर निश्चित पद्धतीने त्यांनी योग्य विचार करावा”, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले.

शरद मोहोळ याच्या मृत्यूनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. “शरद मोहोळ हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते. हिंदुत्वाचं कुठलंही काम असो, शरद मोहोळ तिथे हजर असायचे. कार्यकर्त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असायचे. एकंदर मोहोळ कुटुंबियांचं हिंदुत्वासाठी निर्विवाद काम होतं”, असं राणे म्हणाले.

हिवाळ्यातील स्टोअर- सर्वात लोकप्रिय शैलींसह डिपिंग तापमानावर मात करा- 75% पर्यंत सूटपर्यंत सूट
“प्रसारमाध्यमांत शरद मोहोळ यांची गुंड म्हणून प्रतिमा मलिन केली जात आहे. शरद मोहोळ गुन्हेगारीत कसे आले, का आले? याची माहिती मीडियातील मित्रांना नाहीये. त्यामुळे उगीचच त्यांची चुकीची प्रतिमा रंगवू नये”, असं नितेश राणे म्हणाले.

“हिंदुत्ववादी समाजासाठी काम करणं, हिंदू समाजासाठी उभा राहणे हे नक्कीच सोपे नाहीये. हिंदुत्वासाठी त्यांचं आभाळाएवढं काम होतं. जर अशा व्यक्तीची माहिती माध्यमे चुकीच्या पद्धतीने सांगत असतील तर त्यांनी याबद्दल विचार करावा एवढीच विनंती या निमित्ताने मी करेन”, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.

शरद मोहोळच्या हत्येनंतर स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, म्हणाल्या, मला न्याय…
“आज मोहोळ कुटुंबीय संकटात असताना स्वाती वहिनींना आधार देण्यासाठी मी पुण्यात आलो. मोहोळ कुटुंबियांना आधार देणं ही माझी नैतिक जबाबदारी होती. स्वाती ताईंनी खचून जाऊ नये. त्यांनी हिंदुत्वाचं कामं जोमाने सुरू ठेवावे, त्यांच्या संघर्षात आम्ही सोबत आहोत”, असंही राणे म्हणाले.

“शरद मोहोळ यांच्या हत्येचा पोलीस योग्य तो तपास करत आहेत. काल देवेंद्रजींना ते भेटले आहेत. या तपासामध्ये नेमकं काय होतं यावर सगळ्यांची नजर आहे. जी माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या अन्य लोकांच्या माध्यमातून पोलिसांना जी माहिती हवी आहे, ती पोहोचविण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं, हे लवकरच लोकांसमोर येईल”, असं राणे म्हणाले.