शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

0
391

पिंपरी, दि.०९ (पीसीबी) – राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या संदर्भात राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला दाखल झाल आहे. भाडखाउ तुझा दाभोळकर केला जाईल, अशा स्वरूपाची धमकी ट्विटर द्वारे देण्यात आली आहे.

शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या औरंगाबाद दौऱ्यात जुन्या सवयीनुसार औरंगाबाद असा उल्लेख केला होता. आपली चूक दुरुस्त करत नंचर छत्रपती संभाजीनगर असेही ते म्हणाले. प्रत्यक्षात एका माध्यमाने पवार यांंनी, मी औरंगजेबच म्हणेल, असे वृत्त प्रसारित केले होते. कदाचित त्या संदर्भातून ही धमकी आली की काय याबाबत पोलिस तपास करत आहेत. अहमदनगर, कोल्हापूर येथे औरंगजेबाचा फोटोचे कारण झाले आणि तणाव निर्माण झाला होता. हे लोन राज्यात पसरत चालले आहे. आगानी निवढणुकीसाठी जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम दुही निर्माण करण्यासाठी कोणीतरी हे कारस्थान करत असल्याचा आरोप विरोधकांनी केली आहे. पवार यांना धमकीचा प्रकार हा त्यातलाच भाग तर नाही ना या दिशने माहिती घेणे सुरू आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी शिष्टमंडळासह आज सकाळी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. माध्यमांशी बोलताना, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. जर का काही बरे वाईट झाले तर त्याची सर्व जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची असेल, असेही त्या म्हणाल्या.