शरद पवार यांनी घेतली खासदार गिरीश बापटांची भेट

0
163

पुणे, दि. २६ (पीसीबी) : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बापटांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही बापट यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली आहे.

काल (रविवारी) निलम गोल्हे यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली. “बापट साहेब कसे आहात, सभागृहातील अनेक सदस्य आपली आठवण काढत आहे. तुम्ही अधिवेशनात जे कामकाज केले.त्याबद्दल अनेकांनी आठवण काढली,”असे गोऱ्हे म्हणाल्या.

निलम गोऱ्हे म्हणाल्या, “अधिवेशन होताच आपणास अनेक सदस्य भेटण्यास येणार आहे.आपण लवकर बरे व्हा,” असे म्हणताच “हो ताई, पण अधिवेशन कस चाललय आणि आणखी किती दिवस सुरू आहे,” असे बापट म्हणाले. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सभागृह चांगल चाललय आणि ३० तारखेपर्यंत अधिवेशन चालेल,पण तुम्ही लवकर बरे व्हा,”