शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची मागणी

0
333

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी म्हणजे राष्ट्रपतीपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल व २१ जुलै रोजी दिल्लीत निकाल जाहीर करण्यात येतील.

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. यानंतर शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपतीपदासाठी सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार नसतो. केवळ विधानसभा व लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधीचे या निवडणुकीत मतदान करू शकतात. त्यांच्या मतांचे मूल्य विजयी उमेदवार ठरवतं. सध्या आकड्यांचं समीकरण पाहता भाजपचं पारडं जड आहे. भाजपने दिलेला उमेदवार राष्ट्रपतीपदावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने शरद पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी शिवसेनेच्या गोटातून होत आहे.