पिंपरी, दि. १० (पीसीबी) – लोकनेते, माजी केंद्रीय कृषीम मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने संपूर्ण डिसेंबर महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ०१ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२२ या दरम्यान राज्यातील संपूर्ण जिल्हांमध्ये व तालुक्यांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे सदर शिबिराच्या आयोजन करण्यात येणार आहे. सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, फ्रंटल व सेल अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विविध क्षेत्रातील मान्यवर विचारवंताचे मार्गदर्शन मिळणार आहे. सदर शिबिराचे उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
१३ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२२ पर्यंतचा कालावधी हा “स्वाभिमान सप्ताह” म्हणून साजरा करणार आहे त्यानिमित्ताने शहरांमध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, क्रिकेट स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, शॉर्ट फिल्म स्पर्धा असे विविध स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन स्वाभिमान सप्ताह मध्ये करण्यात आले आहे.











































