- पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा लढण्याची तयारी
पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही विधानसभा लढविण्याची तयारी महाविकासआघडी आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने सुरू केली आहे. भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादी पेक्षा इच्छुकांचा ओढा साहेबांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे असल्याने रंगत वाढत चाचली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षांकडून येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘पक्ष उमेदवारी अर्ज’ मागविण्यात आले आहेत. पिंपरी मध्यवर्ती कार्यालय, पिंपरी चौक येथे अर्ज उपलब्ध आहेत. उमेदवारी अर्ज आजपासून दिनांक २६/०८/२०२४ ते ३१/०८/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायं ०६ वाजेपर्यंत अर्ज उपलब्ध असतील.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख व वेळ दिनांक ०३/०९/२०२४ सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत असेल, असे पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.
भोसरी, पिंपरी व चिंचवड विधानसभेतील इच्छुक उमेदवारांचे ‘पक्ष उमेदवारी अर्ज’ आपल्या पिंपरी मध्यवर्ती कार्यालय येथे भरण्यात येतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी.