शरद पवार यांच्या दोन नातवांची लढत

0
187

पुणे, दि. ८ (पीसीबी) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यात असोसिएशनच्या सदस्यपदाची निवडणूक पार पडली. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. राजकारणा बरोबर क्रीकेट संघटनेतसुध्दा पवार घराण्याचीच चलती आहे.

तर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे दोन नातू समोरासमोर उभे राहिले होते. रोहित पवार आणि अभिषेक बोके यांच्यातील लढत थांबविण्यासाठी रविवारी खुद्द शरद पवार यांना मैदानात उतरावे लागले. त्यांच्या प्रयत्नांनंतरही या दोन नातवांमध्ये निवडणूक झाली. तर निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी बाजी मारली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये या संघटनेचे अध्यक्षपदही रोहित पवार यांनी मिळविले आहे.

काल (रविवारी) एमसीएची निवडणूक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या स्टेडियममध्ये पार पडली. या निवडणुकीत या वेळेस संलग्न क्लबमधून आमदार रोहित पवार (शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू) आणि अभिषेक बोके (पवार यांच्या भगिनीचे नातू) यांच्याबरोबरच माजी क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर आणि सुनील संपतलाल मुथा यांनी अर्ज दाखल केले होते.