शरद पवार फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक, तर सुप्रिया सुळे डायरेक्टर; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

0
3

मुंबई, दि. 07 (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीकडून भाजप बहुमताने आल्यास संविधान बदलतील, असा प्रचार करण्यात आला. त्याचा मतांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. तर आता विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या काळात अनेक उद्योग राज्याबाहेर गेले, असं महाविकास आघाडीकडून म्हणण्यात येत आहे. त्यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमधील सभेत बोलताना त्यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. शरद पवार फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक, तर सुप्रिया सुळे डायरेक्टर आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

फेक नेरिटीव्हची फॅक्टरी सुरू झाली आहे. शरद पवार हे फेक नेरिटीव्ह फॅक्टरीचे मालक असल्यासारखे वागत आहेत. ते रोज सांगतायत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रात उद्योग येत नाही. पुणे जिल्हा, पिंपरी- चिंचवड हे औद्योगिक हब आहे. महाराष्ट्रात 52 टक्के गुंतवून महाराष्ट्रात आली आहे. सुप्रिया सुळे या फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर आहेत. त्या म्हणाल्या हिंजवडी आयटी हबमधून कंपन्या स्थलांतरित झाल्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

मी सांगतो फक्त 16 आयटी उद्योग हिंजवडी आयटी हबमधून बाहेर गेलेत मात्र ते महाराष्ट्रातच आहेत. त्यापैकी 13 उद्योग हे महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात गेलेले आहेत. आमच्या महायुती सत्ताकाळात फक्त तीन उद्योग बाहेर गेलेत. मात्र सुप्रिया सुळे विनाकारण फेक नरेटिव्ह निर्माण करत आहेत. आमचं सरकार आल्यावर जुन्या सरकारचं सगळ्या योजना बंद करणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

चिंचवड मतदारसंघात सभा घेत असताना दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी आठवण येत आहे. त्यांनी एक वेगळी ओळख तयार केली. शहराच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कमी वयात आणि महत्वाच्या वेळी ते आपल्याला सोडून गेले. अश्विनी जगताप यांच्यावर चिंचवडच्या जनतेने विश्वास दाखवला. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. लक्ष्मण जगताप यांचं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. लक्ष्मण जगताप आणि आश्विनी जगताप यांच्यावर ज्या प्रमाणे विश्वास दाखवला तोच शंकर जगताप यांच्यावर विश्वास दाखवतील, असं फडणवीस म्हणाले.

नाना काटे यांचं कौतुक आहे. ते महायुतीचं काम करत आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पुणे जिल्ह्यात जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांना महायुतीचा धर्म पाळून जीवाच रान करून त्यांना जिंकून आणू… शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. आपण मेट्रो सुरू केली आहे. आणखी मेट्रोच जाळ विनत आहोत. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड सुरू करत आहोत. त्याच काम करणार आहोत. रिंग रोड चा सर्वात जास्त फायदा पिंपरी- चिंचवड शहराला होणार आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.