शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते एकत्र आले तर आनंदच

0
85

पिंपरी , दि.२० जुलै (पिसीबी) – शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते अतुल बेनके यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यावर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी टिप्पणी केली. सुनील शेळके हे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी बघता कोण कुठे जाईल आणि कोण कोणासोबत युती करेल याचा भरोसा नाही, असे शेळके म्हणाले. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. परंतु, काही महत्त्वाकांक्षी व्यक्ती त्यांना एकत्र येऊ देत नाहीत, असे म्हणत शेळके यांनी रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

सुनील शेळके म्हणाले, शरद पवार हे मतदारसंघात आले म्हणून अतुल बेनके यांनी स्वागत केलं. शरद पवार आणि अतुल बेनके यांच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी माहिती स्वतः अतुल बेनके यांनी मला दिली. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर कोण कुठल्या पक्षात जाईल, कोण कोणाशी युती करेल याचा सध्या भरोसा नाही.