शरद पवार- अदानी भेटीने चर्चा रंगली

0
335

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर शुक्रवारी रात्री उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी तब्बल तीन तास ही बैठक झाली. राजकीय घडामोडींवर देखील चर्चा झाल्याची शक्यता आगे. अदानी हे मोदी आणि पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे आता अदानी महत्वाची भूमिका निभावणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने खळबळ उडत आहे. राष्ट्रवादीच फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या राजकारणाची जोरदार चर्चा रंगली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात बैठक झाली आहे.