शरद पवारांनी पक्ष घरासारखा चालवला

0
194

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत संघर्षावर सुनावणी सुरु आहे. शुक्रवारच्या सुनावणीनंतर सोमवारी दुसऱ्यांदा सुनावणी होत आहे. सुरुवातीलाच शरद पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर अजित पवार गटाने आपलं म्हणणं माडलं.

आयोगात सुरु असलेल्या सुनावणीमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे थेट शरद पवारांना उद्देशून आक्षेप घेतले गेले. शरद पवारांनी पक्ष घरासारखा चालवला, पक्षामध्ये नियमांचं पालन केलं जात नव्हतं, असं अजित पवार गटाच्या वकिलांनी नमूद केलं.विशेष म्हणजे शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच आक्षेप घेण्यात आला. स्वतः निवडून न येणारे इतरांच्या नेमणुका कशा करु शकतात? असा मुद्दा उपस्थित केला केला. शरद पवारांच्या कथित एकाधिकारशाहीचा मुद्दा अजित पवार गटाकडून पुन्हा अधोरेखित करण्यात आला.

अजित पवार गटाकडून अॅड. निरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद करत आहेत. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करीत आहेत. अजित पवार गटाने १ लाख शपथपत्र असल्याचा दावा केलाय तर शरद पवार गटाने ४० हजार शपथपत्र असल्याचा दावा केला आहे. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिले आहे.