शरद पवारांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते, आरक्षण द्यायला त्यांचाच सर्वात मोठा विरोध – फडणवीस

0
200

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केला असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचेचं नव्हते. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजांना झुंझवत ठेवल्याचे फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवार यांच्या मनात असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते असे फडणवीस म्हणाले. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हतं. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळणार मात्र, ओबीसींवर अन्याय होणार नाही
महाराष्ट्रात ज्यावेळी आपलं सरकर होतं त्यावेळी आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या काळत टिकपलं होतं अस फडणवीस म्हणाले. आत्तासुद्दा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. काहीही झालं तरी चालेल असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या आरक्षणावर संकट येणार नाही हे भाजपचं आश्वासन असल्याचे फडणवीस म्हणाले.

विरोधकांना सत्तेच्या राजकारणात अस्तित्व टिकवण्याची चिंता
विरोधी पक्षांना देशाची, समाजाची चिंता नाही तर त्यांना त्यांच्या परिवाराची चिंता असल्याचे फडणवीस म्हणाले. आज आपण पाहत आहोत ते रोज भूमिका बदलत असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना फक्त सत्तेच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्याची चिंता असल्याचे फडणवीस म्हणाले.