शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू

0
352

पिंपरी चिंचवड शहरातील दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा वाढता प्रतिसाद

मुंबई, दि. ३(पीसीबी) – दोन वेळा नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते राहिलेले काळेवाडी भागातील मच्छिंद्र तापकीर यांचे चिरंजीव सागर तापकीर, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शरद पवारांचे एके काळचे रुपीनगर भागातील सहकारी अशोक पवार यांचे चिरंजीव उद्योजक राहुल पवार, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे खजिनदार आणि स्वराज्य विश्व सेवा ट्रस्ट च्या माध्यमातुन वीस वर्षे निगडी ओटास्कीम भागात काम करणारे ॲड. संतोष शिंदे यांनी आज मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमधे प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि पिंपरी चिंचवड शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष इमरान शेख उपस्थित होते, त्यांच्या पुढाकाराने असंख्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.