शरद पवारांची राष्ट्रवादी आता ‘1 बूथ 10 युथ’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणार

0
192

पिंपरी, दि. ४ (पीसीबी)- मावळ लोकसभा व शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयामध्ये सर्व पदाधिकारी, सर्व विधानसभा अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी, सेवा दल पदाधिकारी, बूथ कमिटी सदस्य तसेच कार्यकर्ते यांची ‘1 बूथ 10 युथ’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

आयोजित बैठकीमध्ये उपस्थित सर्व पदाधिकारी बूथ कमिटी प्रमुख, सदस्य यांना प्रत्येक बूथ संदर्भात कार्यपद्धती कशी राबवावी यासाठी नियोजनबद्ध मार्गदर्शन केले. पदाधिकारी व बूथ कमिटी सदस्यांच्या समस्या जाणून घेतल्या, व त्यावर उपाययोजना सुचविल्या.

उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्साह पाहता मावळ लोकसभा मतदारसंघ, तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड च्या वतीने नियोजनबद्ध काम होईल असा विश्वास व निर्धार सर्वांनी व्यक्त केला.