मुंबई, दि. ३० (पीसीबी) . शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष, शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघाच्या राष्ट्रीय स्तरावरील पदांवर महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, गुजरात प्रदेशच्या महिला आघाडी अध्यक्ष नीलिमा देसाई यांनी डॉ. भारती चव्हाण यांची संघटनेच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली असून, त्यांच्यावर इतर दोन मोठ्या महत्त्वाची जबाबदारी ही सोपविण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष, शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघात राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांच्याकडून मोठ्या नियुक्त्या जाहीर, डॉक्टर भारती चव्हाण पुणे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी डॉ. महेंद्र काबरा जळगाव यांची पुन्हा नियुक्ती.
डॉ. भारती चव्हाण यांची राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी तर राष्ट्रीय उपाध्यक्षपदी,डॉ महेंद्र काबरा यांची पुन्हा नियुक्ती, तर प्रदेश उपसचिव पदी काशिनाथ जाधव पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी भाग्यवंत नायकुडे, मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख पदी प्रदीप दिव्यवीर, पश्चिम महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षपदी बाळासाहेब मगर, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉ शिंदे यांचे सह १० नव्या नियुक्त्या निवडी करण्यात आलेल्या आहेत.
डॉ. चव्हाण यांची महा ऍग्रो फेडरेशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
संघटनेची शिष्टर फर्म अंतर्गत महा ऍग्रो कंपनीच्या डायरेक्टर व्हाईस चेअरमन पदाची जबाबदारी ही डॉ भारती चव्हाण यांना देण्यात आलेली आहे.अशी तिहेरी जबाबदारीमुळे संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळणार.
यासोबतच महा ऍग्रो फेडरेशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी डॉ. भारती चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. तसेच संघटनेच्या शिष्टर फर्म अंतर्गत असलेल्या महा ऍग्रो कंपनीच्या डायरेक्टर व्हाईस चेअरमन पदाची जबाबदारी देखील डॉ भारती चव्हाण यांना देण्यात आलेली आहे.
या तिहेरी जबाबदारी मुळे संघटनेच्या कार्यात नव्या उर्जेने आणि नियोजनबद्धतेने काम होईल, असा विश्वास डॉ भारती चव्हाण यांनी व्यक्त केला आहे, तशेच राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉक्टर महेंद्र काबरांसह इतरांना देखील मोठी जबाबदारी ने काम करण्याची ग्वाही दिलेली आहे. शेतकरी संघटनेचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी विचारमंच शेतकरी, कामगार व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात डॉ. चव्हाण यांच्या अनुभवाचा संघटनेस मोठा फायदा होणार असल्याचे मत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार व पदाधिकाऱ्यांनी तसेच संघटनेच्या विविध सिष्टर फर्म महा ऍग्रो फेडरेशन महा ऍग्रो कंपनी ग्लोबल ऍग्रो फाउंडेशन इंदापूर ऍग्रो महाराष्ट्र राज्य किसान महामंडळ , एनयूबीसी वेस्टर्न भारत या शाखांतील पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे., डॉ चव्हाण , डॉ महेंद्र काबरा, निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर काशिनाथ जाधव पाटील, बाळासाहेब मगर , ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे ,बाळासाहेब मगर यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.