शब्दधन काव्यमंचचे काव्य पुरस्कार जाहीर

0
154

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) – शब्दधन काव्यमंचच्या वतीने प्रतिवर्षी दिले जाणारे काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रसिद्ध लेखक आणि निवेदक श्रीकांत चौगुले यांना शब्दधन प्रतिभा पुरस्कार तर कवी हेमंत जोशी आणि कवी सुभाष चटणे यांना कवी अरविंद भुजबळ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

ज्योती शिंदे ( रोहा, रायगड) स्वप्ना जगदळे ( नागपूर) दत्तात्रय खंडाळे( पुणे) शामला पंडित, मयुरेश देशपांडे, अरुण कांबळे, योगिता कोठेकर ( पिंपरी चिंचवड) यांना “छावा काव्य पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा लवकरच करण्यात येणार आहे, असे शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, कोषाध्यक्ष तानाजी एकोंडे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.