दि . २१ ( पीसीबी ) –
पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. वाड्यामध्ये असलेल्या कबरीच्या बाहेर हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या विरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये महिलांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
रविवारी हिंदू संघटनांनी आणि भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कबरी विरोधात आंदोलन केले होते. हिंदू संघटनांकडून ही कबर हटवण्यासाठी 8 दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त वाढवला आहे.
शनिवारवाडा हा ‘आमच्या विजयाचे प्रतीक’ आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्यांनी येऊन नमाज पठण केला आहे, त्या जागेचा शुद्धीकरण आम्ही शिववंदना करून करणार आहोत. असे काम करत असाल तर इथून पुढे खपवून घेतले जाणार नाही. येथे आम्ही आता शिव वंदना करण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत. येथे हिंदू धर्मच चालेल, असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे.











































