“शत्रुघ्न बापू काटे हे सक्षम नेतृत्व , त्यांच्यात भाजपला शहरात पुढे नेण्याची संपूर्ण क्षमता आहे” – डॉ. अमित नेमाणे

0
7

पिंपरी, दि. ३० – (पीसीबी) भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय प्रकोष्ठ पिंपरी-चिंचवड जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अमित वामन नेमाणे यांची निवड झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून आरोग्यसेवा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले व रुग्णांमध्ये लोकप्रिय ठरलेले डॉ. नेमाणे हे संघ परिवाराचे विश्वासार्ह चेहरे मानले जातात. त्यांचे वरिष्ठ भाजप नेत्यांशीही घनिष्ठ व सौहार्दपूर्ण संबंध असून त्यांनी आतापर्यंत विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनजागृती उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

डॉ. नेमाणे यांनी यापूर्वी वैद्यकीय प्रकोष्ठाचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली असून, डॉक्टर समाजातील समस्या मांडणे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवणे व आरोग्यव्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहणे, हा त्यांचा ठाम संकल्प आहे. ते म्हणाले – “मी आरोग्य क्षेत्रात रुग्णांना सोयीस्कर सेवा मिळावी यासाठी प्रयत्नशील राहीन. तसेच डॉक्टर बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठीही ठामपणे उभा राहीन.”

अलीकडेच डॉ. अमित नेमाणे यांचे ‘हास्य खुलविणारा डॉक्टर’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून ते वैद्यकीय व सामान्य वाचकवर्गामध्ये लोकप्रिय ठरत आहे.

आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. नेमाणे म्हणाले – “मी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताना भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष मा. शत्रुघ्न बापू काटे साहेब यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञ आहे. मला ठाम विश्वास आहे की बापू काटे साहेब भा ज प ला पुढे नेण्याची संपूर्ण क्षमता ठेवतात. तसेच आमदार शंकरभाऊ जगताप , आमदार महेशदादा लांडगे जी यांचे मी मनापासून आभार मानतो.”