शटर उचकटून कपडे, रोकड चोरीला

0
201

चिखली, दि. २८ (पीसीबी) – कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून एक लाख 10 हजारांचे कपडे आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 27) सकाळी म्हेत्रे वस्ती, चिखली येथे उघडकीस आली.

दीपक भरत रानावत (वय 35, रा. दत्तवाडी,आकुर्डी ) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे म्हेत्रे वस्ती येथे म्हेत्रे गार्डन समोर भावना कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. बुधवारी रात्री दहा वाजता त्यांनी त्यांचे दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातून एक लाख 10 हजारांचे कपडे आणि रोख रक्कम चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.