शक्यतांवर आज बोलणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्यासारखं

0
340

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. एकीकडे सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात लढण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. पण महाराष्ट्रात मात्र काही तरी वेगळ्याच घडामोडींना वेग आल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकारण ढवळून निघालं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अमरावतीतील विधानानेही राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत आपली भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे, यावर बोलताना निलम गोऱ्हे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहे. पण कोणाला पटेल की नाही माहिती नाही, पण काही प्रश्नांची उत्तरं नियती आणि देव ठरवत असतो. ती उत्तर आपोआपच मिळतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी अनेक शक्यता आहेत. जवळपास सात-आठ शक्यता आहेत. त्या शक्यतांवर आज बोलणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्यासारखं आहे. असं मत निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं.

दूरगामी परिणामांचा विचार करून कधी उत्तर मिळेल? मिळणार आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे. राज्यात जी अनिश्चितता निर्माण झालीये त्यामुळे राज्यातल्या लोकशाहीचं वातावरण भुसभुशीत होतय की काय, त्यात विकासाचे सर्व विषय मागे पडत असल्याची काळजीही वाटत आहे. महाराष्ट्रात काहीही होऊ शकत. लोकांनी आता जे काही होईल त्याला समोर जाण्याची तयारी ठेवण हे क्रमप्राप्त असल्याचं त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, हे महाविकास आघाडीचे शिल्पकार. परिस्थितीनुसार आघाड्या निर्माण होत असतात. परिस्थिती बदलली की बदल होत असतो. हा राजकारणाचाच एक भाग आहे. काय होईल आणि काय नाही होईल हे आता आपण ठरवण्यापेक्षा समोर काय येतय त्या परिस्थितीनुसार, तुम्हाला दिशा बदलावी लागते. परिस्थितीनुसार प्रत्येकाला स्वत:ची सुरक्षितता बदलावी लागते आणि हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

शिंदे गटातील अस्वस्थ नेत्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे असतील का,यावर बोलताना निलम गोऱ्हे म्हणाल्या की, या सर्वांमागे सुत्रधार कोण आहे. त्यांची काय भूमिका आहे. काय होईल किंवा काय नाही, ज्यांना काम करायची इच्छा आहे, त्या सर्वांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे राहतील.पण हेतूनुसार निर्णय घ्यावा लागतो.
संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत लिहीलेला लेख हा महत्वाचा दुवा ठरला होता. यावर बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, संजय राऊत हे समर्थ नेते, लेखक आणि पत्रकार याच स्पष्टीकरण मी देणं योग्य नाही. पण त्यांना जे दिसत ते ते मांडतात. त्यांना दिसलं ते हिताच्या दृष्टीने मांडलं. त्यांचा हेतू काही वाईट असेल असं मला वाटतं नाही.